नाती
जर आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर तो दुरावा कमी करूयात पुष्पौषधी च्या साहाय्याने !!
नाती ही नेहमीच रूजलेली,जोपासलेली असायला हवीत. नुसतच जोडलेले नातं कधीच बंध निर्माण करत नाही. मग हलकासा एखादा धक्का पण हे नात संपवू शकतो.
हा धक्का कश्याच्याही रूपात येऊ शकतो. एखादा गैरसमज, एखादी दुसरी व्यक्ती, एखादी परिस्थिती, अगदी कश्याच्याही रूपात येऊन नातं संपवून जातो.
मग आपण त्या व्यक्तीला, परिस्थितीला दोष देत राहातो.
हा विचार कधीच करत नाहि की हे नात खरच रूजलेलं होत का? ओढ होती का? संवादाच योग्य खतपाणी ह्या नात्यात होत का? आणि त्या नात्याची गरज दोन्हिकडून सारखीच होती का ?
ह्या प्रश्नांची उत्तर शोधताना आपल्याला लक्षात येत की अरे हो खरच आपण समजत होतो किंवा आपल्याला हव होत तस हे नात कधीच नव्हत.
एक सत्य आहे की दोन माणसांमधल नातं कधीच तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटत नसतं. त्याला ती दोन माणसं कारण असतात.
ह्याची कारणं खरं तर व्यक्ती सापेक्ष असू शकतात, पण महत्त्वाचा मुद्दा असतो तो नात्यांची समज किती आहे. ते निभावण्याच्या पध्दतीमध्ये काय आणि कसा फरक आहे. कारण दोघांच्या नात निभवायच्या कल्पना जर उत्तर आणि दक्षिण धृवाइतक्या वेगळ्या असतील किंवा दोघांचे नात जोडायचे उद्देश वेगवेगळे असतील तर संवादाचा योग्य पुल नात्यात कधीच बांधला जात नाही. दोन्हि व्यक्तींची फरफट होते.
नात रूजवायचा प्रयत्न करताना ह्या गोष्टींचा विचार केला गेला तर आणि तरच बंध निर्माण होतात. नाहीतर असत फक्त एक विस्कळीत जोडलेपण जे हलक्या घावानेहि विखरून जाऊ शकतं.
अश्यावेळी ह्या नात्याला निरोप ही एक नवीन सुरवात ठरते एका वेगळ्या प्रवासाची.
बस इतकंच !!
Comments
Post a Comment